तिळाचे लाडू🍘🍘

मकर संक्रांत स्पेशल: घरच्या घरी बनवा तिळाचे लाडू

मुंबई: मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी तीळ गुळ द्या, गोड बोला... असा संदेश देत प्रेम, आपलुकी शिवाय एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा आहे. या सणाच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू झाली असून, तिळ आणि गुळाला विशेष महत्त्व असलेला हा सण तिळाच्या लाडवांशिवाय पूर्ण होत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तिळ आणि गुळाचे लाडू तयार केले जातात. बाजारात तयार लाडू उपलब्ध असले अनेक जण घरच्या घरी लाडू बनवतात. तुम्हालाही तीळ आणि गुळाचे लाडू तयार करायचे असतील तर आम्ही देत आहोत. तिळाचे लाडू तयार करण्याची रेसिपी,.. नक्की करून पाहा

साहित्य:

-अर्धा किलो तीळ,
- अर्धा किलो चिक्कीचा गूळ,
-१ ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट,
- १ चमचा वेलची पूड, १ ते २ चमचे तूप.


प्रथम तीळ मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावेत. नंतर गॅसवर कढई किंवा मोठं भांड ठेवावं त्यात चिक्कीचा गूळ आणि तूप घालावं. गुळाचा गोळीबंद पाक तयार करून घ्यावा. पाक करताना तो सतत ठवळत राहावं. पाक व्यवस्थित झाल्यानंतर भाजलेले तिळ,दाण्याचं कूट

पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, वेलची पूड घालून मिक्स करून घ्यावं. त्यानंतर लगेचच लाडू वळायला घ्या. लाडू वळताना हाताला तूप लावल्यास लाडू सहज वळले जातील व हाताला चिकटणार देखील नाहीत.

तयार लाडू महागले
संक्रातीच्या निमित्ताने घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात तिळाची आणि गुळाची आवक झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. कडक लाडूसोबत सध्या बाजारात मऊ लाडूही उपलब्ध आहेत. मात्र यांचे दर नेहमीच्या लाडूपेक्षा अधिक आहेत. चारशे रुपये किलोच्या घरात मऊ लाडू बाजारात ठराविक ठिकाणी मिळत आहेत. तीळगुळासोबत हलव्यालाही मोठी मागणी आहे. या संक्रांतीसाठी बाजारपेठही सजल्या आहेत. बाजारात सुगड पूजनासाठी मातीची लहान लहान मडकी, उसाची दांडी, ओले हरबरे, वालवड उस यांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे.



Comments